Thursday, 17 July 2025

खारूताई (बालकविता)




 पादाकुलक-

बालकविता


खारूताई


खारूताई खारूताई

तुरुतुरुतुरुतुरु चाले बाई

झाडावरून फांदीवरती

इकडे तिकडे धावत राही


कुरूम कुरूम खाते खाऊ

म्हणते बाजाराला जाऊ

चणे फुटाणे नि शेंगदाणे

आपण सारे घरीच नेऊ


पट्ट्यांची ती घाले चोळी

म्हणते मी तर आहे भोळी

झुपकेदार शेपूट तिचे

हलवित फिरते सायंकाळी

 

रामभक्त ती कट्टर आहे

मदतीसाठी त्वरीत धावे

अंगावरचे काळे पट्टे

साक्ष सांगण्या मिरवित जावेतै


झाडावर ती निवास करते

छान लाकडी ढोली असते

ऊन असो वा पाउस वारा

मनास मुळीच चिंता नसते


सौ.जया नेरे

9423918363

No comments:

Post a Comment