चल पावसात खेळू
आपण दोघे मिळून
चल पावसात खेळू
थंडगार पाण्याने
नाक लागेल गळू
थपथप करत
चिखलात लोळू
घर करू चल घेऊ
ओलीचिंब वाळू
पावसात भिजतोय
शेजारचा बाळू
कागदाची नाव
सोडतोय हळू
पावसात भिजण्या
आली आता लिलू
कोपऱ्यात बसलेले
पाहिले तिने पिलू
पिलूला भरली होती
खूपखूप थंडी
लिलूने दिली त्याला
आणून एक बंडी
टुणकन पिलू आता
आईच्या कुशीत बसला
लिलूकडे पाहून मग
खुदकन हसला
सौ.जया नेरे
9423918363

No comments:
Post a Comment